Untitled 1

ब्लॉगींग टिप 2 : ब्लॉग तुमच्यासाठी आहे तुम्ही ब्लॉगसाठी नाही हे लक्षात ठेवा

दिर्घ काळ ब्लॉगींग करू इच्छिणार्‍यांसाठी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण ब्लॉगिंग का करत आहोत ते स्वतःशी नीट ठरवा. ब्लॉगींग करण्यामागे अनेक कारणे असु शकतात जसे प्रसिद्धी, जाहिरातींद्वारे आर्थिक उत्पन्न, आपल्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवणे, मनातले दबलेले विचार मोकळे करणे, विरंगुळा, आपल्या साहित्य प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे इत्यादी इत्यादी. कारण काहीही असले तरी तुमच्यासाठी ब्लॉग आहे ब्लॉग़साठी तुम्ही नाही हे लक्षात ठेवावे. बहुतेक ब्लॉगर्स आपापला नोकरी-धंदा सांभाळून ब्लॉगींग करत असतात. मी असे अनेक ब्लॉगर्स पाहिले आहेत की ज्यांचा ब्लॉग सुरवातीला त्यांचा asset असतो पण कालांतराने liability बनतो. असे घडले की मग ब्लॉगींगमधील मजा, आनंद निघून जातो. काही वेळा नकळत, सुक्ष्म स्थरावर हे घडत असते. जर तुमच्या वैयक्तीक जीवनात खालीलपैकी कोणत्याही गोष्टी घडत असतील तर वेळीच सावध व्हावे :

  • कार्यालयात काम करत असताना बरोबरीने ब्लॉगच्या नोंदी लिहिणे. वारंवार ब्लॉगवर काही प्रतिक्रिया आल्या आहेत का ते बघणे. ब्लॉगच्या वाचकांबरोबर कार्यालयीन वेळेत बराच काळ चॅटींग वा सोशल नेटवर्किंग करणे.
  • ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांनी दिवसभर अस्वस्थ रहाणे. त्यांमुळे मित्रांवर वा सहकार्‍यांवर चिडचिड करणे.
  • मनातल्या मनातच ब्लॉग वाचकांचे अभिप्राय, प्रतिक्रिया, वाद-विवाद यांचे काल्पनिक चित्र उभे करणे आणि त्यात रंगणे.
  • घरी आपल्या आईवडिलांबरोबरचा, पत्नीबरोबरचा वा मुलाबाळांबरोबरचा वेळ अतिशय कमी करून तो ब्लॉग लेखनासाठी देणे.
  • सकाळी उठल्याउठल्या आधी कॉंम्पुटर चालू करून वाचकांच्या आलेल्या ई-मेल्स किंवा ब्लॉगच्या प्रतिक्रिया बघणे.
  • रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशीही विश्रांती न घेता ब्लॉगविषयक कार्य करणे.
  • ब्लॉगद्वारे आपले खरे व्यक्तिमत्व झाकून काल्पनिक व्यक्तिमत्व वाचकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करणे.
  • काही काळ ब्लॉगींग करता आले नाही तर मनात अपराधीपणाची भावना निर्माण होणे.

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 09 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates