Untitled 1

ब्लॉगींग टिप 9 : ब्लॉगच्या नोंदींचा बॅकअप जरूर घ्या

ब्लॉगींगच्या वेब साईटस नोंदी लिहिण्यासाठी ऑनलाईन एडिटरची सुविधा पुरवत असतात. असे जरी असले तरी प्रत्येक नोंद प्रथम आपल्या कॉम्प्युटरवर लिहा (नोटपॅड, एक्स्प्रेशन वेब, वर्ड किंवा तुमच्या आवडीचा कोणताही HTML Editor तुम्ही यासाठी वापरू शकता) आणि मगच ती ऑनलाईन एडिटरमध्ये टाका. याचा एक फायदा असा की तुमच्याकडे नोंदीची प्रत राहते आणि दुसरे म्हणजे spell checking वगैरे करायचे असेल तर सोपे जाते. समजा आज तुमचा ब्लॉग ब्लॉगरवर आहे पण काही वर्षांनी तो अन्यत्र हलवायचा असेल तर? सर्वच ब्लॉग इंजिन्स Import - Export ची सुविधा देतीलच असे नाही. काही वेळा तुमच्या नोंदी काही तांत्रिक वा अन्य कारणांमुळे जसे संगणक प्रणीलींमधील दोष, नैसर्गिक आपत्ती इत्यादी नाहीशा होण्याचा धोका असतो. अशा वेळी तुमच्या नोंदी तुमच्याकडे सुरक्षित रहातात. काहींना ही जरा अतिशयोक्ती वाटेल पण ज्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रामधे कधी काम केलय त्यांना माहित असेल की गेल्या काही वर्षांत युद्ध, दहशतवादी हल्ले, भुकंप, सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती यांमुळे अनेक कंपन्या भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या भागात असलेल्या ठिकाणी बॅकअप साठवा असा आग्रह धरतात. 


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 16 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates